Englishहिंदी
मराठीInterviewCreativityGalleryDesigned ByCongratulations |
आई - परमेश्वराची मूर्ती!! मातृ देव भव!!सार्या जगात आई ही श्रेष्ठ आहे. आई तळहाताच्या पाळण्यावर बाळाचे रक्षण करते. दूध व पौष्टिक आहार देऊन ती त्याला संभाळते. एक आई आपल्या मुलाला जे अनोपचारिक शिक्षण देते ते शिक्षण एका शिक्षकाला देता कदापीही शक्य नसते म्हणून एक आई सह्स्त्र शिक्षकांपेक्षाही श्रेष्ठ आहे. कवी यशवंतयांनी म्हणटले आहे की " स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी". आई बाळाची जननी असते. ती तेव्हा बाळासाठी ब्रह्मदेव असते. ती त्याचे पालन करते व विष्णुदेवाचे कर्तव्य पूर्ण करते व संस्कार देऊन महादेवाचे ही कर्तव्य पार पाडते म्हणूंच आई त्रिदेव वास करते. आई ही आपल्या मुलावर प्रेमाचा वर्षाव करत असते आणि मूल मोठी झाल्यावर आईचे उपकार विसरतात. एकदा एका हट्टी मुलाने आपल्या पत्णीच्या सांगन्यावर आपल्या आईचे काळीज मांघितले. तेव्हा त्या आईने केवळ मुलाच्या प्रेमसाठी आपले काळीज दिल. परंतु धावत जाताना मुलाच्या पायाली ठेच लागते. तेव्हा कळजातनं आवाज येतो "बाळा तुला लागलं तर नाही ना?" आई दुधाच्या साई प्रमाणे असते, ज्या प्रमाणे दुधाचे सर्व तत्व त्या साई मधे असतात त्या प्रमाणे आई सर्व धरतीतल्या लोकांमध्ये समावते व गृहलक्ष्मी बनते. " जिथे जिथे वृक्ष आहे, तिथे आहे छाया. जिथे आहेस तू आई, तिथे आहे माया". आई मुलाच्या आयुष्यात शीतलता आणते, त्याचवर संस्कार करते, त्यांना चांगले गोष्ठी सांगून त्याचा विकास करते. आई मध्ये अलौकिक शक्ति असते. शिवाजी महाराजांची आई जिजामाता यांनी त्यांना सदैव गोष्टी सांगून त्यांच्यावर चांगले संस्कार केले. महात्मा गांधी यांची आई कस्तुरबा गांधी यांनी देखिल त्यांना घडवले. लेकरासाठी आई प्रसंगी कोणतेही कष्ट सोसण्यास तयार होते. रायगडावर हिरकणी नावाची स्त्री आपल्या मुला करता कठीण अशा बुरुजावर चडली होती. आईच्या वास्तल्य आणि करूने खाली मूलं मोठी होतात. भक्त पुंडलिकांनी तर प्रत्येक्ष भेटीला आलेल्या पांडुरंगाला विटे वर उभे केले होते. साधू संतांनी म्हणटले आहे की " जननी जन्मभुमी स्वर्जा पेक्षा ही श्रेष्ट आहे". रोज आपल्या आईच्या पायावर डोक ठेवावे व आशीर्वाद घ्यावा. आपले काम यशस्वी होते. तिचा आदर करावा मातृ-पितृ देव भव!! - शिवानी गोगावले (डी.सी.पी. 3rd यिअर)
|